राज्यशात्र महत्वाचे प्रश्न | Polity MCQ in Marathi
Q. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे?
1) भाग 1
2) भाग 2
3) भाग 3
4) भाग 4
स्पष्टीकरण
- भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 (कलम 12 ते 35) मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत.
- भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते.
- घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क यूएसएच्या घटनेवरून घेतले आहेत.
- आपल्या घटनेतील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कापेक्षा अधिक विस्तृत आहेत.
Q. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे?
1) कलम 14
2) कलम 16
3) कलम 15
4) कलम 17
स्पष्टीकरण
- राज्यसंस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही.
- या कलमातील ‘भेदभाव’ व ‘केवळ’ हे दोन निर्णायक शब्द आहेत.
- येथे भेदभाव म्हणजे ‘व्यक्तींमध्ये प्रतिकूल ठरेल असा विभेद निर्माण करणे होय’.
- ‘केवळ’ या शब्दावरून असे प्रतीत होते की नागरिकांमध्ये केवळ धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, मात्र इतर आधारावर भेदभाव केला आऊ शकतो.
Q. एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे?
1) 20 (2)
2) 21 (3)
3) 21 (4)
4) 22 (1)
स्पष्टीकरण
- कलम 20 (2) नुसार, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही.
- अपवाद मात्र डबल जेपर्डी पासून संरक्षण केवळ न्यायालयासमोर किंवा न्यायाधीकरणासमोर चालू असलेल्या कार्यवाहीबाबतच प्राप्त होते.
- असे संरक्षण डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यासमोर चालू असलेल्या कार्यवाहीच्या बाबतीत प्राप्त होणार नाही, कारण हे प्राधिकारी न्यायिक स्वरूपाचे नसतात.
Q. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे?
1) अनुच्छेद 32
2) अनुच्छेद 51 A
3) अनुच्छेद 39 A
4) अनुच्छेद 21 A
स्पष्टीकरण
- कलम 51 (A) – मूलभूत कर्तव्ये, एकूण 11
- भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.
- पुढे 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीने घटनेत 10 मूलभूत
- कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने 11 वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.
- भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हीयत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत.
- स्वर्ण सिंग समितीने (1976) मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली. या समितीने सुचविलेल्या 8 कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला.
Q. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेले आहे?
1) 18
2) 16
3) 14
4) 12
स्पष्टीकरण
- कलम 24 नुसार, चौदा वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावरती लावले जाणार नाही.
- यावरून हे कलम धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही.
- बाल कामगार प्रतिबंध व नियम कायदा 1986 हा त्याविषयी सर्वात महत्त्वाचा कायदा आहे.
Q. हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्त्व भारतीय राज्यघटनेच्या कलमांमध्ये दिले आहे.
1) कलम 344
2) कलम 350 (अ)
3) कलम 351
4) कलम 348
स्पष्टीकरण
- हिंदी भाषेचा प्रसार वाढविणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे संघराज्याचे कर्तव्य असेल.
- हे मार्गदर्शक तत्त्व न्यायप्रविष्ठ नाही.
- 350 – तक्रार निवारण्याची भाषा
- 350 (A) – प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण
- 351-हिंदी भाषेचा विकास
Q. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे?
1) कलम 41
2) कलम 42
3) कलम 43
4) कलम 44
स्पष्टीकरण
- एकरूप नागरी संहिता ही एक अशी तरतूद आहे ज्याद्वारे प्रत्येक मोठ्या धार्मिक समुदायाचे धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरावर आधारलेल्या वैयक्तिक कायद्यांच्या जागी देशातील सर्व नागरिकांना लागू होईल असा एकच सामायिक संच असावा.
- वैयक्तिक कायदा हा सार्वजनिक कायद्यापासून वेगळा असतो आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणे, पोटगी यासारख्या विषयांचा समावेश होतो.
- गोवा राज्यामध्ये सामायिक कौटुंबिक कायदा स्वीकारलेला असल्याने गोवा हे एकरूप नागरी संहिता असलेले भारतातील एकमेव राज्य आहे.
Q. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते?
1) 31
2) 14
3) 32
4) 30
स्पष्टीकरण
- कलम 32 चा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हमी युक्त, प्रभावी, जलद गतीने, कमी खर्चात व संक्षिप्त उपाय योजना उपलब्ध करून देणे हा आहे.
- नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते त्यांना न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी घटनेत उपाययोजना करण्यात आली असल्याने या हक्काला ‘घटनात्मक उपाय योजनेचा हक्क’ असे म्हणतात.
- कलम 32 अंतर्गत प्राप्त हक्क बजावण्यासाठी आधी मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालेले असणे ही एक पूर्ववत अट आहे.
- घटनेतील गैर मूलभूत हक्क वैधानिक हक्क, प्रथाजन्य हक्क इत्यादींना संरक्षण कलम 32 अंतर्गत प्राप्त नाही.
Q. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे?
1) शेजारील देशातील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य देणे. ,
2) राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण करणे
3) देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे.
4) भारताच्या इतिहासाबद्दल अधिक अधिक आणून घेण्यासाठी कटिबद्ध असणे.
स्पष्टीकरण
- कलम 51 A मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहेत.
- भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.
- आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंग समिती स्थापन केली.
- भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आले आहेत.
Q. संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक प्नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते?
1) कलम 17
2) कलम 222
3) कलम 21
4) कलम 31
स्पष्टीकरण
- कलम 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती शिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही.
- हा हक्क नागरिक तसेच परकीय नागरिकांना उपलब्ध आहे.
- न्यायालयाने अमेरिकन घटनेप्रमाणे “कायद्याची उचित प्रक्रिया” हे तत्त्व या कलमाला लागू केले त्यामुळे कलम 21 अंतर्गत संरक्षण असंगत कार्यकारी कृती बरोबरच असंगत संसदीय कृतीविरुद्धही प्राप्त आहे.
Q. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे?
1) अनुच्छेद 14
2) अनुच्छेद 16
3) अनुच्छेद 17
4) अनुच्छेद 18
स्पष्टीकरण
- कलम 16 अंतर्गत सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी देण्यात आली आहे.
- कलम 16 (1) नुसार राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल
- तर कलम 16 (2) नुसार कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, गुण, जन्मस्थान, निवासी यापैकी कोणत्याही कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही अथवा त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही.
Q. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे?
1) 53 अ
2) 50 अ
3) 52 अ
4) 51 अ
स्पष्टीकरण
- कलम 51 अ मध्ये दिल्याप्रमाणे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये एकूण 11 आहेत.
- आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंग समिती स्थापन केली.
- भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत.
Q. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही ?
1) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
2) संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे.
3) संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर राखणे.
4) पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे. (मुंबई पोलीस 2021)
स्पष्टीकरण
- महत्त्वाची मूलभूत कर्तव्ये – (एकूण 11)
- राज्यघटना, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर राखणे.
- वारसाचे जतन करणे.
- सार्वजनिक (सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणे)
- 6 ते 14 वर्ष वयाच्या बालकांना शिक्षण देणे.
- देशाचे संरक्षण करणे व गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे.
Q. भारतीय राज्यघटनेत ‘मूलभूत कर्तव्य’ कोणत्या परिच्छेद मध्ये विस्तृत आहेत ?
1) 56 अ
2) 50 अ
3) 51 अ
4) 51 अ
स्पष्टीकरण
- 42 वी घटनादुरुस्ती (1976) नुसार घटनेत मूलभूत कर्तव्य हा भाग टाकण्यात आला.
- मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली.
- सध्या 11 मूलभूत कर्तव्यांची यादी दिली आहे.
- मूलभूत हक्क – कलम 12 ते 35 – अमेरिका
- मार्गदर्शक तत्त्वे – कलम 36 ते 51 – आर्यलंड