Advertising म्हणजे काय? | Advertise Writing Tips in Marathi
काही काळापूर्वी जाहिरात लिहून काढणं हे काहीसं दूर जाताना दिसत होत मात्र सध्या डिजिटल युगात देखील जाहिरात सुरू करणं आणि त्यासाठी आधी जाहिरात लिहून काढणं खूप महत्वाचं आहे. जाहिरात लिखाणाची प्रक्रिया ही आज पुन्हा एकदा सुरू करायची आहे तर त्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहे. एकदा सुटलेली सवय पुन्हा लागण्यासाठी वेळ जातो हे मात्र नक्की आहे. त्यासाठी काही टिप्स वापरून आपण सवयी लवकर आत्मसात करू शकतो.
जाहिरात म्हणजे नक्की काय? । Advertisement meaning in Marathi
जाहिरात म्हणजे आपल्या उत्पादनाला विकण्यासाठी त्याला इतरांच्या नजरेत आणणे. जाहिराती या इमेज, व्हिडिओ आणि लेख तिन्ही स्वरूपात असतात. त्यातून आपले उत्पादन(product) कसे भारी आहे हे दाखविण्याचा सर्वात मोठा प्रयत्न असतो.
जाहिरात करून आपण आपल्या उत्पादनाची विक्री करू शकतो. आज पेपर मध्ये जाहिराती, रस्त्यांवर जाहिराती सोबत डिजिटल प्लॅटफॉर्म वर जाहिराती करून लोकांचे व्यवसाय वृद्धिंगत होत आहेत. मात्र हे जाहिरात लेखन कला फक्त 9 वी आणि 10 वी च्या अभ्यासक्रमात मर्यादित राहून त्या लुप्त होत आहेत.
जाहिरात लिहिणे हे सोप्पे काम नाही. कारण यात कमीत कमी मात्र मार्मिक शब्दात जास्तीत जास्त दाखवायचे असते. त्यामुळे या टीप्स तुम्ही नक्की फॉलो करा.
जास्तीत जास्त वाचा
अनेकदा आपण ऐकल असेल की वाचाल तर वाचाल! हे अगदी बरोबर आहे. कारण तुम्हाला जर चांगल्या प्रकारे लिहायचे असेल तर जास्तीत जास्त वाचन हाच एक पर्याय आहे. वाचनातून तुमचा शब्द साठा वाढत जातो. त्यामुळे तुम्हाला एखाद्या शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द सुचतात. यातून तुम्हाला अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करतील असे शब्द सुचतील.
जाहिराती मध्ये लोकांच्या मनाला हिट करतील अशा गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळे हे लेखन प्रत्येक शब्दातून त्या व्यक्तीला टार्गेट करणारे असावे.
जाहिरात लेखन सुधारत जावे
तुमच्या लेखनातील चुका तुम्हाला प्रत्येक सराव नंतर लक्षात यायला हव्यात. अनेकदा जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेकदा एखाद्या व्यक्तीने आपल्या जाहिराती मध्ये चुका काढल्या तरी देखील त्या सकारात्मक दृष्ट्या घेऊन त्यात सुधारणा कराव्यात. कारण प्रत्येक व्यक्ती हा जाहिरात त्याला कशी चांगली वाटेल या दृष्टीने सल्ले देत असतो.
लेखनातील चुका या शक्यतो व्याकरण धरून असतात. त्यामुळे व्याकरणात असलेल्या चुका थोड्या फार प्रमाणात तुम्ही सुधारल्या तर अगदी चांगल्या जाहिरात लेखणापर्यंत तुम्ही जाऊ शकता.
ब्रेक घ्या
अनेकदा आपल्याला काही जास्त सुचत नसेल तर शांततेत थोडा वेळ बसून रहा. अनेकांना कदाचित या वेळी चहा किंवा कॉफी ची गरज असते. तुमच्या विचारांना जर भरारी घ्यायची असेल तर काही काळ डोकं अगदी शांत ठेवून राहणं आवश्यक आहे.
लेखक हा त्याचं बेस्ट लेखन फक्त शांत आणि निवांत असताना देऊ शकतो. आपण ऐकत असाल की कंटेंट क्रियेटर हे मुख्यतः जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट लिहायला घेतात त्याआधी किंवा त्यावेळी पर्यटन स्थळांना भेटी देतात. यातून त्यांची मनस्थिती चांगली राहते आणि त्याचा परिणाम त्यांच्या लिखाणावर होत असतो.
वेळेचे योग्य नियोजन करा
जाहिरात लिहिण्यासाठी जर तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर वेळेचं नियोजन करून या कार्यासाठी अधिकाधिक मोकळा वेळ देणे गरजेचे असते.
तुमच्या ग्राहकांना ओळखा
ग्राहकांना ओळखून त्यांच्या शब्दात जाहिरात करणे हे कधीही फायद्याचे असते. म्हणजे तुमच्या उत्पादनाचं ग्राहक हे पूर्ण कोकणातील आहे तर मग त्या जाहिराती मध्ये तुम्ही कोकणी भाषेचा वापर केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येणार आहे.
काहितरी हुक असू द्या
हुक हा शब्द तसा इंग्रजी आहे पण तुमच्या जाहिरातीत काहीतरी अशी गोष्ट असावी ज्यावर ग्राहकांचे लगेचच लक्ष्य जायला हवे. यामध्ये एखाद्या मोडेलचा फोटो तर येतो मात्र त्यासोबत तुमची एखादी हिट करणारी ओळ खूप महत्वाची असते.
जाहिरात लेखन कसे करावे?
या टीप्स शिवाय जाहिरात लेखन करत असताना काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणं अगदी गरजेचं आहे.
आकर्षक जाहिरात – जाहिरात ही नेहमी लोकांचे लक्ष्य वेधून घेणारी आणि आकर्षक असावी. यामध्ये रंगाची संगती अगदी योग्य रीतीने वापरायला हवी.
कमी शब्दात अधिक मूल्य – जाहिरातीवर कुठल्याही प्रकारे आपल्याला उतारा लिहून द्यायचां नसतो. जाहिरात ही अगदी कमी शब्दात अधिकाधिक प्रभावी असावी लागते.
घोषावक्याचा वापर – जाहिराती या एखाद्या स्लोगन मुळे जास्त प्रचलित होतात. जसे की पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, दो मिनट में …. वैगेरे.
ऑफर द्या – जाहिराती मधून तुम्ही जर ऑफर देणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त हायलाईट करून दाखविल्या तर त्यातून तुम्हाला अधिकाधिक फायदा नक्की होणार आहे.
संपर्क करण्यासाठी गोष्टी द्या – जाहिरात ही कितीही आकर्षक असली तरी देखील त्यातून जर लोकांना तुमच्यापर्यंत कसे पोहोचायचे याचा मार्ग दिलेला नसेल तर ते तुमची जाहिरात बघून सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे खालील बाजूस तुमचा संपर्क क्रमांक, ईमेल आणि वेबसाईट असेल तर ती द्यावी.
निष्कर्ष
इयत्ता नववी आणि दहावी च्या अभ्यासक्रमात मर्यादित न राहता आता डिजिटल मार्केटिंग सारख्या क्षेत्रात देखील जाहिराती वापरल्या जातात. त्यामुळे तुमची जाहिरात लेखन कला ही अधिकाधिक चांगली असणे गरजेचे आहे.
आशा आहे की तुम्हाला जाहिरात लेखन करण्यासाठी काही टिप्स आवश्यक आहेत हे समजले असेल. काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा.
Also Read