प्लेटलेट्स म्हणजे काय? | Platelets meaning in Marathi
आपल्याला अनेकदा पावसाळ्यात प्लेटलेट्स कमी झाल्या, वाढल्या यासारख्या गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र आपल्या शरीरातील या प्लेटलेट्स म्हणजे नक्की काय असत? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
प्लेटलेट्स म्हणजे काय?
प्लेटलेट्स या आपल्या शरीरातील बँडेज सारखे असतात. आकाराने गोलाकार आणि अगदी लहान असलेल्या या शरीरातील पदार्थाला आपण अनेकदा व्हिडिओ मध्ये बघितले असेल. प्लेटलेट्स च्या माध्यमातून आपल्या शरीरात जिथे जखम होईल तिथे रक्त गोठण्यास मदत होते.
जेव्हा या प्लेटलेट्स ची संख्या कमी होते तेव्हा आपल्या शरीरातील रक्तस्राव जास्त वाढून आपण आजारी पडतो. प्लेटलेट्स या कोणत्याही रंगाच्या नसतात. आपल्या शरीरात यांची निर्मिती बोन मॅरो या भागात होते. प्लेटलेट्स सोबत लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी यांची निर्मिती देखील याच भागात होते.
प्लेटलेट्स चे कार्य
प्लेटलेट्स ला मानवी शरीरातील कवच कुंडले या नावाने ओळखले जाते कारण प्लेटलेट्स या मानवाला मरण्यापासून वाचवतात असे म्हणायला हरकत नाही. आपल्या शरीरात रक्ताचा सतत प्रवाह होण गरजेच असत. रक्ताच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सीजन चा पुरवठा होत असतो. आपल्या शरीरावर कुठेही जखम झाल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून जाण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या शरीरातील प्लेटलेट्स आणि काही फायबर हे एकत्र येऊन तिथे रक्ताला थांबविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे रक्तस्राव अधिक होत नाही आणि कोणत्याही प्रकारे ईजा होणार नाही.
प्लेटलेट्स काऊंट
मानवाच्या शरीरात दीड ते साडेचार लाख प्लेटलेट्स प्रती मायक्रो लिटर रक्त इतकी असते. महिलांमध्ये प्लेटलेट्स ची संख्या ही 1 लाख 57 हजार ते 3 लाख 71 हजार इतकी असते. पुरुषांमध्ये हे प्रमाण 1 लाख 35 हजार ते 3 लाख 17 हजार असते.
प्लेटलेट्स संख्या जास्त झाल्यास
प्लेटलेट्स ची संख्या वाढत असेल तर त्याला थ्रोंबोसाईटोसिस हे नाव देण्यात आले आहे.
प्लेटलेट्स ची संख्या जर वाढत असेल तर त्यामुळे आपल्या शरीरात जिथे गरज नाही अशा जागांवर देखील रक्त गोठू शकते. यामुळे आपल्याला हृदय विकाराचा त्रास किंवा स्ट्रोक येऊ शकतो. अनेकदा यामुळे शरीरातील एखादा भाग बधिर झाल्यासारखं जे जाणवत त्यामागे प्लेटलेट्सची संख्या वाढणे हे कारण असते.
प्लेटलेट्स संख्या कमी झाल्यास
प्लेटलेट्स ची संख्या कमी झाल्यास त्याला थ्रोंबोसाईटोपेनिया हे नाव देण्यात आले आहे.
प्लेटलेट्सची संख्या जर कमी होत असेल तर परिणाम म्हणजे तुमच्या शरीरात रक्त जिथे गोठायला हवे तिथे ते घडणार नाही. रक्त गोठत नसेल तर रक्तस्राव अधिकाधिक होईल आणि याचा परिणाम हा नाकातून रक्त बाहेर येणे असा होतो.
आपल्या शरीरावर येणारे लालसर व्रण येतात. याच्या मागे आपल्या शरीरातील प्लेटलेट्स ची संख्या कमी कमी होणे हे कारण असते.
रक्ताप्रमाने प्लेटलेट्स पण करता येतात दान!
रक्ता इतकचं प्लेटलेट्स दान करणे महत्वाचे आहे. कारण जेव्हा एखादा कॅन्सर पेशंट असतो तेव्हा त्या रुग्णाला केमोथेरपी नंतर होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं तेव्हा प्लेटलेट्स ची मदत त्यांना रिकव्हरी साठी घेता येते.
इतरही अनेक रुग्णांमध्ये प्लेटलेट्स दान मधून मदत होईल. तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला प्लेटलेट्स दान करता येतात. प्लेटलेट्स डोनेट करत असताना तुम्ही 7 दिवसानंतर आणि वर्षातून 24 वेळा तुम्हाला हे दान करता येते.
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास काय करावे?
प्लेटलेट्स ची संख्या कमी झाल्यास काही पथ्य पाळावे लागतात. त्यांची यादी खाली देतो आहे.
- अधिक दगदग करू नये. याने रक्त प्रवाह अधिक वेगाने होऊन रक्तदाब वाढू शकतो.
- लसूण सेवन केल्याने देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो.
- कठीण आणि थकवा आणणारे व्यायाम करू नये.
- शरीरावर जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
- दातांना ब्रश लागू देऊ नये. लागल्यास हिरड्या मधून रक्तस्राव अधिक वेगाने होईल.
- जास्त उष्णतेत बाहेर पडू नये.
प्लेटलेट्स संख्या जास्त झाल्यास काय करावे?
प्लेटलेट्स जास्त असतील तर शरीरातील इतर आजारांचे निदान होऊन ते ठीक झाले की सर्व काही ठीक होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर औषधे घ्यावेत.
FAQ
Q. प्लेटलेट्सचा उपयोग काय आहे?
A. आपल्या शरीरात जखम झाल्यानंतर होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी प्लेटलेट्स कार्य करतात.
Q. प्लेटलेट्स वाढविण्यासाठी काय सेवन करावे?
A. प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर त्या काळात पालक, डाळी, केळी, बदाम आणि लिंबू यासारख्या अन्नाचे सेवन करावे.
Q. प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
A. कुठल्याही प्रकारे व्यसन करत असाल तर प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर हे व्यसन करणे पूर्णपणे टाळावे.
Q. नॉर्मल प्लेटलेट्स काउन्ट किती असावा?
A. मानवी शरीरात नॉर्मल प्लेटलेट्स काउन्ट हा दीड लाख ते साडेचार लाख इतका असावा.