Samsung vs Apple Comparison in Marathi 2024
स्मार्टफोन मध्ये अनेक नवीन कंपन्या आल्या आहेत, तर दुसरीकडे काही जुन्या नोकिया सारख्या कंपन्या संपल्या देखील आहेत. मात्र यात देखील प्रीमियम मोबाईल मार्केट मध्ये ॲपल आणि सॅमसंग या दोन्ही ब्रँड ने आपले अस्तित्व फक्त ठीकवून ठेवले नाही तर त्यात वेळेनुसार सुधारणा देखील केली आहे.
आजच्या घडीला ॲपल आणि सॅमसंग या कंपन्या नवीन दर्जाच्या टेक्नॉलॉजी मार्केट मध्ये सुरू करण्यात आणि नवीन मोबाईल Device लाँच करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चला तर मग आजच्या या लेखातून या दोन्ही कंपनी मध्ये काय फरक आहे आणि कोणत्या गोष्टी दोन्ही कडे सारख्या आहेत याविषयी जाणून घेऊयात.
सॅमसंग कंपनी
Samsung ही कंपनी साऊथ कोरियन आहे. खूप आधी पासून या क्षेत्रात या कंपनीचे वर्चस्व आहे. 1938 मध्ये सॅमसंग कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर आजही कंपनी इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल मार्केट मध्ये एक उच्च दर्जाचे नाव आहे.
Samsung कंपनीने सुरुवातीच्या दिवसांमध्ये टिव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि विक्री करणे सुरू केले होते. पुढील काळात त्यांनी स्मार्टफोन मार्केट मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. आजच्या घडीला सॅमसंग कंपनी चे स्मार्टफोन हे बजेट सेगमेंट पासून तर प्रीमियम सेगमेंट मध्ये उपलब्ध आहेत. सॅमसंग कंपनीचे मोबाईल हे उत्कृष्ठ कॅमेरा, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि डिझाईन साठी लोकप्रिय आहेत.
ॲपल कंपनी
ॲपल कंपनीची सुरुवात ही अमेरिका मध्ये झाली होती. आजच्या घडीला संपूर्ण आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये ॲपल हे नाव प्रसिद्ध आहे. 1976 साली स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझनियक आणि रोनाल्ड वेईन यांनी ॲपल कंपनीची स्थापना केली.
ॲपल कंपनीचे इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट होम उपकरणे आहेत. ॲपल ने मार्केट मध्ये त्यांचे नाव इतरांपेक्षा वेगळे बनविले असून ते त्यांचा फोनला आय फोन, लॅपटॉपला मॅकबुक तर टॅबलेटला आयपैड सिरीज अंतर्गत प्रमोट करतात.
ॲपल ही कंपनी प्रीमियम लक्झरी प्रोडक्ट साठी प्रसिद्ध आहे. ॲपल कंपनी आपल्याला इको सिस्टम बनविण्यासाठी प्रोत्साहित करते कारण त्यांचे सर्व उपकरणे ही एकमेकांसोबत जोडली जातात. डिझाईन, लेटेस्ट टेक आणि उत्कृष्ठ दर्जाचे कॅमेरा यासाठी ॲपल कंपनी प्रसिद्ध आहे.
Samsung विरुद्ध Apple: ऑपरेटिंग सिस्टम
सॅमसंग कंपनी आपल्या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरते. अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टम गुगल अंतर्गत चालते. या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सर्व काही सोईस्कर आहे. मात्र या मध्ये तितक्या उच्च दर्जाची सिक्युरिटी मिळत नाही. अँड्रॉइड ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे.
याच्या अगदी विरुद्ध ॲपल मोबाईल मध्ये म्हणजेच आयफोन मध्ये आपल्याला iOS अर्थात ॲपल ऑपरेटिंग सिस्टम मिळते. iOS ही ऑपरेटिंग सिस्टम ॲपल ने स्वतः बनविली असून त्याचा फायदा अधिकाधिक सिक्युरिटी आणि इको सिस्टम बनवून देण्यासाठी होतो.
Samsung विरुद्ध Apple: डिझाईन
स्मार्टफोन कंपनी ही आपल्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या डिझाईन लाँच करत असते. म्हणजे अगदी बजेट सेगमेंट पासून तर ॲपल कंपनीच्या प्रीमियम सेगमेंटला टक्कर देणारे फोन हे सॅमसंग कंपनीचे आहेत. त्यामध्ये लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन या कंपनीकडून वापरल्या जातात.
ॲपल कंपनी कडून फक्त प्रीमियम सेगमेंट मध्ये मोबाईल लाँच केले जातात. त्यांचे इतर उत्पादन देखील प्रीमियम किंमतीत मिळतात. ॲपल कडून डिझाईन मध्ये जास्त बदल हे दिसत नाहीत. त्यांच्या 3-4 वर्षांच्या सिरीज नंतर काहीतरी मोठा डिझाईन बदल हा घडत असतो.
Samsung विरुद्ध Apple: इको सिस्टम
सॅमसंग कंपनी ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरत असल्याने कोणत्याही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरून आपण स्वतःच इको सिस्टम बनवू शकतो. त्यामुळे ॲपल पेक्षा सॅमसंग डिव्हाईस हे लवकर इको सिस्टम बनवू शकतात आणि त्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च करावा लागणार नाही.
ॲपल ही कंपनी स्वतः फक्त इकोसिस्टम प्रमोट करत असते. त्यांचा उद्देश हा आहे की त्यांचीच सर्व उत्पादने त्या वापरकर्त्यांने वापरावीत. मात्र जेव्हा तुमच्याकडे ॲपल इकोसिस्टम असते तेव्हा तुमचे सर्व काही शेअरिंग अगदी जलद होतात.
Samsung विरुद्ध Apple: ॲप्स आणि गेम्स
अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टम ओपन सोर्स आहे. त्यामुळे सॅमसंग मध्ये तुम्हाला ॲप्स आणि गेम्स डाऊनलोड करण्यासाठी कुठल्याही प्रकारे पैसे खर्च करावे लागत नाहीत. त्यासाठी मोबाईल मध्ये प्ले स्टोअर दिलेला असतो. सॅमसंग मध्ये वेगळ्या ठिकाणांवरून ॲप्स आणि गेम्स डाऊनलोड करता येतात. त्यामुळे सॅमसंग मध्ये आपल्याला हवा तसा कस्टमायझेशन करता येते.
ॲपल दिवाईस मध्ये iOS ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये ॲपल स्टोअर मधून आपल्याला गेम्स आणि ॲप डाऊनलोड करावे लागतात. ॲपल ऑपरेटिंग सिस्टम वर कुठल्याही प्रकारे बाहेरून ॲप गेम्स डाऊनलोड करता येत नाहीत. याच्यामागील कारण म्हणजे iOS मध्ये सिक्युरिटी वर जास्तीत जास्त भर दिला जातो.
Samsung विरुद्ध Apple: किंमत
सॅमसंग कंपनीचे उपकरणे ही सर्वसामान्य व्यक्ती पासून तर अगदी श्रीमंत व्यक्तीला हव्या अशा किंमतीत वेगवेगळ्या भागात उपलब्ध आहेत. सॅमसंग मधील प्रीमियम सेगमेंट ही खूप जास्त महाग देखील नाही. या सेगमेंट मध्ये सॅमसंग कंपनी कडून सध्या S आणि S Pro या सिरीज प्रसिद्ध आहेत.
ॲपल कंपनीचे स्मार्टफोन किंवा इतरही उपकरणे ही प्रीमियम किंमतीत मार्केट मध्ये आहेत. त्यामुळे ॲपल चे वापरकर्ते हे खिशात पैसे असणारे लोक असतात. सर्व सामान्य जनतेला मात्र ॲपल कंपनीची उपकरणे वापरणे तसे खिशाला परवडणारे नाही.
सॅमसंग आणि ॲपल कंपनी मधील साम्य
सॅमसंग आणि ॲपल या कंपनी त्यांच्या उत्पादनांच्या क्वालिटी आणि जाहिराती यामध्ये खूप जास्त लक्ष देतात. कॅमेरा मध्ये देखील सॅमसंग आणि ॲपल कंपनी दोन्ही उत्कृष्ठ फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी नेहमी उपकरणांमध्ये बदल करत असतात. आजच्या घडीला या दोन्ही कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल हे कॅमेराला टक्कर देण्यासारखे फोटो काढतात. मोबाईल मध्ये सिनेमॅटिक मोड, ड्युअल कॅमेरा व्हिडिओ मोड सारखे उत्कृष्ठ फीचर्स दोन्ही कंपन्या देतात.
सिक्युरिटी मध्ये ॲपल कंपनी जेव्हढे लक्ष देते तितकंच लक्ष हे सॅमसंग कंपनीच्या प्रीमियम सेगमेंट मध्ये लक्ष दिलेले असते. बॅटरीचा बाबतीत दोन्ही कंपन्याचे स्मार्टफोन चांगले बॅकअप देतात.
FAQ
Q. कॅमेरा बाबतीत सॅमसंग आणि ॲपल मधील कोणता स्मार्टफोन चांगला आहे?
कॅमेऱ्याच्या बाबतीत सॅमसंग चे मोबाईल चांगले आहेत मात्र व्हिडिओ ग्राफी मध्ये ॲपल कंपनीचे मोबाईल हे उत्तम आहेत.
Q. ॲपल कंपनीची सुरुवात कोणी केली?
ॲपल कंपनीची सुरुवात ही स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझनियक आणि रोनाल्ड वेईन या तिघांनी मिळून केली आहे.
Q. ॲपल आणि सॅमसंग कंपनी पैकी कोणत्या कंपनीचा सेल जास्त आहे?
ॲपल कंपनीचा मागील 2023 वर्षांनुसार सॅमसंग पेक्षा जास्त सेल आहे. भारतात देखील सॅमसंग पेक्षा ॲपल कंपनीचा सेल जास्त आहे.
Conclusion
ॲपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपनी भारतात नव्हे तर संपूर्ण जगात एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुख्य दोन कंपनी आहेत. त्यांच्या मध्ये चालू असलेली चुरस ही ग्राहकांना उत्तम उत्पादने देण्यासाठी कारणीभूत आहे.
Also Read